/%-७५) ९. %-% पैशनि्रगिशीगेनी डकल

054014 (1॥॥१'5[7 119110

ट्क्के | 32 01 ४००५-उल्टा त्रडा्ट पला त्म्ट ढे |

ऐिवतार 0 १" 02401 ळल ०... 3०:40... के” कक केक के कि /

; | (अ ०... :

()॥५॥४/८॥२७/१|_ (13२, रँ

0[)_ 192850

/ ४०९8] ॥४$७--/॥४)

नागपूर प्रकाहन क्रमांक--२०

म्हणे लढाई संपली !

बी. रघुनाथ

नागपूर प्रकाशन, सितावर्ढी, नागपूर.

प्रकाराकलळ दि. मा. धुमाळ नागपूर प्रकारान, सिताबडी, नागपूर,

>

भु यापुढील आवृत्तींचे हक्क लेखकाचे स्वाधीन, 01९६0 1980

मुखवपृ

षावरील चित्र श्री. दिनानाथ दलाल याचे आहे..

दौड रुपया

१९४६

मुद्रक-- ल. म. पटले

रामेश्वर प्रिटिंग प्रेस, सिताबडी नागपुर.

माझे मित्र

भालचद्र कहाळेकर आणि भगवंत देशासुख यांना--

प्रकाशित ओ५ साको हिरवे गुलाब आलाप आणि विलाप बाबू दडके उत्पात अलकेचा प्रवासी

माग पहिला

तडा

बाभूळखेडं !

कुठं कोणत्या देशांत अन्‌ कोणत्या महान तत्वा- साठी लढाई चाळू होती कुणास ठाऊक! ती कुणी चालवली होती न्‌ ककी चालली होती कांही कळत नव्हतं ! ती केव्हा संपणार होती संपली असल्यास तिचा शेवट कसा झाला होता याचाहि कुणाला अंदाज लागणं शक्य नव्हतं.

बाभूळखेड्याला फक्त एकच गोष्ट समजली,

लढाई सुरूं झाळी !

पूवी असं होत की, कोबडा आरवला, पांखर किलबिल करूं लागली की, बाभूळखेडं मोठ्या उमेदीने जागं होत होत. दिवस मोठ्या प्रसन्नतेने कामधामांत घालवून रात्र पडूं डागली की देवदशन, भोजनोत्तर एकाद्या देवळांत भजन किंवा पेर-

ग्हणे लढाई सपली !

पाण्याच्या गोष्टी आटोपल्यावर उद्याची मोठी रम्य स्वप्न रचित झोपा जात होते !

सटीला न्‌ पाडव्याला गांबांतल्या बाबूलाल खावकाराकडं जमा करायचं ते केल्यावर खाते- बाकी ऐकून बाभूळ खेड्याचा शेतकरी आपल्या. अडाणी पद्धतीनं मनांतल्या मनांत हिशेब करीत होता.

अं! सव्वाशेच राह्ाठेत ! दोभर पंचवीस! त्याची काय मामठत्‌! म्होरलळ॑ साल आलं कॉ बावूलालचं तोड पहायचं नाई !...””

हा निश्चय तडीस जात होता.

मग घरांत एकादे लग्नकाये उभं राहिलं तर भुन्हां उचल; पुन्हां सवाई; त्याचा घम वाटत नव्हता ! लग्नांत ॥हरांतला बन्डबाजा आणता येत होता. रोषनाईेचा आरास करतां येत होती. पुढं कल होईल हे विचार करण्याची अवश्य- कताच वाटत नव्हती!

बयाभूळखेड्यांतल्या घराघराच्या चतकोर तुक- ड्यावर जगत असलेल्या फकीराचा फत्तू नांवाचा झुलगा देखील यात्रेत उरुसांत चायना सिल्कचं

तडा श्‌

शट घालून मारे चैन करीत हिंडत असलेला दिसत होता.

आबादानीने अमीरांची घरं सोन्याची केली असलीं तरी गरिबांचे निदान उंबरठे का होईना उजवबायला कमी केलं नव्हतं!

नामदेव न्‌ नगीनाचं तर कांही विचारू नका!

नामदेव असा निघेल नगीना सुध्या मतीन संसार करील असं कुणालाहि वाटलं नाही.

नामा म्हणजे ऐतखाऊ, कामांतून गेलेले न्‌ बिघडलेलं कारटं असाच गांवांत दुलोकिक होता. तो विड्या फुंकीत होता. रंगढंग करणाऱ्याच्या अड्थावर त्याची अषण्ेप्रहर बेठक हाती. खायला: प्यायला चांगलं न्‌ वेळेवर मिळावं, घरांत आपली मिजास सांभाळली जावी अक्षी इच्छा वागवीत होता. चैनबाजीला पैसे कमी पडले तर घरांतल्या गाडग्या मडक्‍यावर डला मारीत होता अन्‌ तो तसा मिळाला तर आहेही भांडत होता. कामधामाच्या गोष्टी निघाल्या तर बापाला दुरु- प्तरं करीत होता!

पकुलत्या पक मुलाबद्दल कधी संतापून तर कंधी वैतागून आईबाप म्हणत होते--

१० म्हणे लढाई संपलीं ! नाम्या जन्मताच खलास झाला असता तवर वबारभर फडक्यावरच आरटोपलळं अततं!

बापानं शेतांत मरमर करून कजोचा बोजा कमी करण्याचे बत करायचे, आईनं मोलमजुरी करून संसाराच्या रोजच्या गरजा भागवाव- याच्या, न्‌ कत्योसवरत्या मुलानं घरातली असल नसेल तेवढी चीजवस्तू विकून चेन करीत हिंडायचं !

एकदां तर अश्ा गाष्टांचा कळस झाला!

आहे सरळपणानं पेसे देईना म्हणून रागाच्या तिरमिर्रात त्यानं तिच्या तोंडांत भडकावली. स्हातारी झीट येऊन पडली. बायकोच्या हातां- तल्या रुप्याच्या पाटल्या हिसकावून घेऊन पका भआाडदुकानांत फुंकून टाकल्या म्‌ कोल्हाटणीची थन केली.

मग लहान मोठ्या चोऱ्या होऊं लागल्या. झका जलक्यांत मुद्देमालासह तो पकडला गेला न्‌ जेलखाम्याची हवा खात बसला !

शिक्षा संपवून तो बाहेर आला. बापानं केव्हांच कारभार आटोपला होता. मरू घातलेली आई

तडा 4.4

सुलगा दारांत येतांच गतप्राण झाली होती. अन्‌ माहेरी निघून गेलेली बायको पटकोत पार झाल्याचं वृत्त त्याची वाट पहात होत.

मग कुठं नामदेवाचे डोळ उघडले. त्याने थोडसं कजे काढलं. एकट्याच उरलेल्या बेलाला जाळी विकत घेतला. शेत नीट केलं. पेरून काढलं. त्यासाठी पीकही अपेक्षेबाहेर आलं. म्हणून बाबू- लालच्या अगदी घश्यापर्येत गेले वावर त्याला वाचवितां आलं. तशात नगीनाची न्‌ त्याची गाठ पडली. त्यानं तिच्याशी म्होतूर लावलं न्‌ एकादा सालसमाणसा सारखा तो वागू लागला !

नगीना तर मुलखाची चवचाल ! लगीन झाल्यावर पकदांच काय ती सासरी गेली न्‌ नांदायचं नाही म्हणून सरळ परत आली. गांवा- तळे खडे अंगावर पडूं लागले. एक दिवस नव- न्याला नोटीस देऊन तिनं सोडचिठ्ठी घेतली. मग तिच्या बदफेली पणाला तर कांद्दींच ताळतंत्र राहिलं नाही ! रावजी नांवाचा एक जोडीदार तिनें निवडला ' ठेवला '. त्याच्यासाठी तिने घरदार सोडलं. ती स्वतंत्र राहूं लागली. आपली

१२ म्हणे लढाई सपली !

मोल मजुर्रीची कमाई त्याच्या सुखावर खचे करूं लागली रावजीनं तिचा उपभोग घ्यायचा तोवर मनसोक्त घेतला नगीना एकदोन दिवस कुटं परगांबी गेली होती. रावजीची लज्ञाची बायको शाहाणी हाऊन संसार करायला आली. नगीनाला तै समजलं ती परत आली ती चवताळलेल्या वाधिणी सारखी ! अपरात्राींच रावजीच्या खोलीचं दार तिने घडकावलं अन्‌ बायको शेजारी झोप- ळेल्या रावजीला खसकन ओढून तिनं म्हटलं,

चहाटला ! तुझ्यासाठी घरदार, गणगोत सोडलं. सारी मिळकत तुझ्या जिवासाठी रिच- विली, ती अशी केसानं गळा कापण्यासाठी ?

संतापाने ती थरथरत होती रावजी भेदरून निशाद्व उभा होता.

खाडकन रावजीच्या थोबाडांत भडकावून ती परतली रात्रभर मुळपुळ रडत बसली

दुसऱ्या दिवशी सकाळीं जो प्रकाश फाकला, त्याने अबखळपणातळीा, अविचारातली सारा मस्ती नाहीशी केली. विवेक आणि सुविचारांना मार्ग करून दिला. दुराचाराचं अंतिम्‌ काय, हे दाखविलं नगीनाची चित्तशुद्धि केली.

तडा १३

/ल---------५--पा-ााल----ााा

नामदेवाच्या मागणीला तिनं रुकार दिला तो विवेक खडखडून जागा झाल्यावर !

लोकाचाराला संमत नसलेल्या मार्गावरून बेफाम धावत सुटलल्या दोन शाक्ति एकत्र आल्या- वर केवढं चांगलं कार्य होऊं शकत याची प्रचाती बाभूळखेड्याला येऊं लागली.

नामदेवाच पडायला झालेलं रिकामं घर नगी- नाने खरंच धड केलं. ती मोल मजुरा करू लागली. दोन अर्डाच मेलावर असलेल्या शह- राच्या शनिवारच्या बाजाराला जाऊं लागणी. बाजार आटोपून परततांना भिकाऱ्याच्या रांगे- तल्या एका दीन आंघळीला नियमानं पेसा टाकू लागली. अन्‌ देवळा पुढं येतांच तिच्या मनांतला भक्तिभाव जागा होऊं लागला. पूवायुष्यातला एकदा मित्र भेटला तर त्याच्याकड ती दुंकूनहि पाहिनाशी झाली.

नामदेवाशी गधवे बिवाह झाल्याबरोबर तिच्या ठिकार्णी अश्शी कांही नेतिकता आठी कीं कोणत्याहि शीलवतीला ती शोभून दिसावी ! शत जवानीतल्या त्या उत्सखळ भरांत तिनं जन-

१४ म्हणे लढाई सपली !

पत सक अवत माना. आननद मडलमनिनकडजाननरयका गडा

लज्नेची पवा केली नव्हती चव्हाट्यावर घसर- लला पदर तसाच सोडून फिदफिदा हसण्या इतका निलजपणा तिच्या ठिकाणीं आला होता. रावजी अथवा रावजीसारख्या दोस्ताबरोबर बोलतांना सभ्यतेचा कोणताच सकेत तिन पाळला नव्हता ससारी झाल्यापासून मात्र तिन सारे छद फद सोडले. चार माणसासमोर पदर घेऊन ती लवून चाळू लागली. प्रोढपणान बोलू लागली पाहिल्या रात्री आपल शरोर आणि सवस्वच नाम- देवाच्या स्वाथीन करायची ती वळ आलो ! त्या वबळेला आतां माधुरी आली होती. एकाद्या ओढ्या- कांठी, पुरुषभर वाढलेल्या ज्वारीच्या गददंशेतांत, किंवा कधा एकाद्या पडक्या नाहीतर फाटक्या अडोशाला घडाडलेलं तिचं काळीज त्यावेळा थरारले ! तिनं चटकन्‌ दिवा मालविला.

प्रकाशांत वामगामो जोबनातळी बिभत्स चित्र तिला दिसूं लागला म्हणून नव्हे?

उरावरली रत्नं चार चोघांत मिरवायची नस- तात ! उराशी घरून ती. आत्मीय करायची अस-

तडा ११२

*-------------*५-----:-:-:>>><>>२>->>:-::५-४-५॥॥-॥ा-ाा----

तात! मिणमिणत्या दिवट्याची त्यासाठी मध्यस्थि कशाला ?

नामदेवानंहि मोठ्या विश्वासांन तिला जवळ केल!

> >< >< ><

लढाई आली ती कमालीची दुष्ट अशुभे पस- रवीत ! लढाई एकाद्या संक्रातीसारखी दक्षिणे- कडून येत होती न्‌ उत्तरकड जात होती अस नव्हे तर दाही दिशांनी तिचा संचार होता ! माग केव्हां एकदा असंच युद्ध झालं होतं. त्यावेळी माणसं जबरीनं धरून नेली जात होती, हीच कायती एक आठवण कांहीं उरलेल्या म्हाताऱ्यांत पसट होती.

हो नवी लढाई महागाई नांवाची कृत्या घेऊन आली. पूर्वी रुपयाची ज्वारी नवरा बायकोला आठ दिवस पुसत होती. आतां धाम्यावर नियंत्रण बसलं. धान्य हळं हळु अदश्य होऊं लागलं न्‌ दिसत होतं त्याचा बाजारभाव पाहून डोळे पांढरे होणार असं वाटूं लागळं. नगीना शनिवारच्या बाजाराला जाऊं लागली. परततांना आंधळ्या

१८ म्हगे लढाई सपली !

गाम. सत्र कमग पडणार जा डळडन- हला सावताडव मत्ता कचता कड -याल ती

हआबबाबय््ग

भिकारणी पुढं येतांच तिचा हात अडखळूं लागला !

कुठं दूरवर रक्‍तपात होत असतील. त्यांतून काही चांगलं निष्पन्न होणार असेल किवा नसेल- ही त्यादूरच्या देशांत होणाऱ्या घातपाती कृत्यांनी मात्र एका सरळ मनावर हा पहिला आघात केला!

पका सकाळी नगीना पाणट्याहून परत येत होती. पक हात डोकक्‍्यावरल्या घागरी वर होता. दुसऱ्या हातांत दोरखंडानं भरलेला पाहरा होता. अंगणांतल्या बाजवर रिकरुटासारखा पोशाख केलेला एक माणूख बसला होता.

जवळ आल्यावर नगीनान ओळखल, रावजी!

नगीनाच्या त्या तशा अवघडलेल्या अवस्थकडं तो टक लावून पहात होता. प्रौढपणांतल्या पएवबिकास आणि उद्लासाने उठून दिसत असलेली ती खोंद्य॑वेल कित्येक दिवसानंतर तो पहात होता. मस्तीच्या भरांत कुरवाळलेली चुबिलली योवनपुष्प होती तशीच होती. किंबहुना ती आतां अधिक आकषेक आणि उपभोग्य दिसत होती. ती पुन्हां जवळून पहाण्याची कुरवाळण्याची

तडा >)

नन >> नक

एक अनावर इच्छा रावजीच्या मनांत उऱ्भवली त्याच्या दृष्टीला उत्कठेनं एक विचित्र घार आली.

ती धार नगीनाला गुदगुल्या करण्याणवजी बोचली मात्र ! तिनं घाइनं घागर खाळी ठेवली न्‌ पदर सरळ करून तोंडाचा गळ्याचा ओला- वलेला भाग पुसून काढला.

त्यानं विचारलं,

“वळख आहे ना?

तिनं माननंच होकार दिल्यासारख केलं

त्यानतर कांही क्षण मोठी विच्रित्न शांतता होती, काय बोलावं दोघांनाहि समजत नव्हत

तशांत नामदेव आला. त्यानं रावजीळा ओळ- खल्यावर म्हटलं,

अरे वा! रावजी? कवाशिक आली सवारी! बायकापोर खुशाल आहत ?”

मग त्यान घरांत डोकावलं म्हटलं,

अग ए, रावजी आलाय कांहीं च्या पानी कर का !”'...

१८ म्हणे ठढाई संपली !

अपुऱ्या गुळाचं कढतं पाणी पोटांत गेल्यावर राष्ट़री सुरू क्षाल्या. रावजी फोजेत नोकर होता. मरणाचं भय टाकलं तर मानाची सखाची नोंकरी होती. त्यानं शहरांत घर केलं होत. दर महिन्याला पघरावीस रुपये बायकोच्या नांवाने पाठावितां येत होते पोशाख आणि खाण्यापिण्याची वाण नव्हती. एवढी महागाई असली तरी सामान मिळवायची फारशी अडचण पडत नव्हती. एका फोजी माणसाचं कुटुंब सरकार उपाशी मरू देईल शक्‍य नव्हत. मान मरातवाच कांही चारू नका ! फौजी म्हटलं की गाडीत ऐस- पैस जागा मिळत होती किंवा स्वतंत्र डब्यांतून व्यवस्था होत होती. तो आघाडावर असला न्‌ घरी एकादी अडचण निघाली तर ती अधि- काऱ्यांना सांगून चटकन्‌ दूर करता येत होती.

नामदेवाच्या मर्नांत निराळी कल्पना वतेळं चमकू लागली. रावजीसारखाच स्वतःच्या अंगा- वर त्याला पोशाख दिसला. खिश्यांत पैसे खुळखुळू लागले. नियमानं दर महिम्याला तो नगीनाच्या नांवाने मनिओंडेर पाठवु लागला. शेतांतली मर-

तडा १९

*--ऱपनसन------:-२>----- पापा “पट” डन

मर नाहो. बाबूलालचा लकडा नाहीं, कांही नाही !

रात्री नगीनाजवबळ लढाईत जाण्याची त्यानं गोष्ट काढली. एकादी अद]ुभवाणी छऐेकल्यावर व्हावं तसं तिचे सार अंग सकंप झाले. तिने म्हटलं,

“£ मला एकाद्या इहीरींत टाका मग करा काय करायचं त!”

बराच वेळ ती कांही बोलली नाहो. “पडी” असं म्हणून नामदेवानं मिठी मारली तेव्हां तिला बरं वाटळं अन्‌ मनांत सलत असलेला एक संदाय नाहीसा झाला

कुठून रावजी आला होता कुणास ठाऊक ! त्यानं नामदेवाच्या डोक्यांत नसते विचार रुजांवेले होते. एवढेच नव्हे तर तिचंही मन अज्शांत करून टाकलं होतं.

तो पुनः पुन्हां मोठ्या भुकेल्या नजरेन तिच्या- कडं पहात होता. नामदेव घरांत नाहीं अशा संथी पाहून त्याने नगीनाळा म्हटलं होत, नगीना ! तला पहावं, भेटावं म्हणून इथवर आलों. तूं तर बोलायलाहि राजी नाहींस !...”

२० म्हणे छढाई सपली

नगीनाने कांहीच उत्तर केलं नव्हतं ! अन्‌ अशा मुग्धतेतच त्यांची भट संपली होती.

नगीनाचं मन एकाच विचारानं भारावलं होतं. रावजीच्या आगमनाने नामदेवाच्या मनांत आपल्याविषयी पकादा संशय तर आला नसेल, या भयानंच रावजीची नजर तो टाळीत होती. मिठी पडल्यावर नामदेवाचं मन आवेचल असल्याची तिची खात्री झाली. नामदेव खरंच एक देव माणूस होता, या सुखद समजुतीन तिनहि मिठी घातली होती न्‌ ती अधिकच रढतर केली होता !

> > >< ><

कलेकक्‍्टरांच्या न्‌ मामलेदारांच्या बढत्या खोळं- बून असाव्या लढाई अक्या अवस्थत आली होती कीं मरायला माणसं कमो पडणार असं वाटत होतं. माणूस नाहीं म्हटलं कीं लढाई कशी चाल- णार ? दोस्तांच्या युद्ध प्रयत्नांना मदत म्हणून प्रथम खेडींपाडी झाडून न्‌ झटकून भरपूर पैसा नेला होता. त्या पैक्षांत दारूगोळ्याची 'पेदास भरपूर झाली होती. पण तो छातीवर घ्यायला न्‌ छातीयर उडवायला माणूस तर हवा होताना !

तडा -३4

अगदी वरच्या थराच्या लढाईच्या व्यवस्थापकां- तून हुकूम सुटले,

माणसं पाठवा !”

हुकमाची 'घडक संस्थानांतल्या कलेक्टर मामलेदारांच्या छातीवर येऊन आदळली. नोकरी करायची म्हटळ॑तर मामलेदारान कलेक्टर साहेबाला खूप ठेरणं भाग होत. अन्‌ खुप ठेवणं म्हणजे कांही खेडुतांच जीवन सावेभोम सत्तचा प्रतिनिधी म्हणून आलेल्या फोजीा अधिकाऱ्याच्या स्वाधीन करण आवडयक होत !

ही एक भयकर लांच होती !

अन्‌ लोकांचं जावनसंरक्षण करण्याचा अधि- कार ज्यांना होता ते, ही लांच देत घत होते!

बाभूळखेड्यावर मामलेदार साहेब दोऱ्यावर आले चावडीवर तळ पडला. गांवातली पंघरा- वीस जवान पोर धरून बसविली. नामदेवाची शरीरयष्टी तर सगळ्यांत उजवी ! कमीत कमी दोन तीन गोळ्यापयंत सद्दजञ टिकाव धरील अश्शी ! नामदेवानं पंघरावीसजणांच्या भळ्यांत बसतांना प्रथम विशेष कुरकूर केली नाही. पण

२२ म्हगे लढाई सपलो

वेळ जाऊं लागला तसतशी विलक्षण भयकारक दृष्यं त्याच्या डोळ्यापुटून सरकली बाभूळ- खेड्याच्या शिवेवरचं त्याचं होत एकदम जोमानं रसरसून आल. पण नामदेवाला तिथपर्यंत पोचता येईना. सुभोच्या खु्लीत नगीना हंसत उभी असलेली दिसली पण तिला जवळ करतां येईना. मग साऱ्या गाञ्रांत एकदम बघिरता येऊन रस- रसळलं शोत न्‌ सुसमुसळेळी नगीना दृष्टी आड झाली. नामदेव मेला ! तोहा दूरच्या अनोळखी प्राम्तात-जिथं त्याची नर्गांना नाहीं, शेत नाही अन्‌ बाभूळखड्याचं पाराचित वातावरण नाही!

नामदेवाच्या अंगावर काटा उभा राहिला! त्याला वाटलं आपण इथून पळून जावं पण तेथून हालण कठीण होतं अन्‌ त॑ जस जसं कठीण वाटत गेलं तसतशा त्याच्या काळजाची घडको वाढत गेली!

मामलेदारसाहेब आवेशानं व्णाख्यान देत होते. हिंदुस्थान, आपलं सरकार, त्राटेश सत्ता, जपान, शत्रू, सकट अश्या एकेक फुगीर शाब्दांच्या अड्या- तून एकच सार निघालं होतं,

फौजेतली नौकरी चांगली आहे!

तडा .4$-

नगीना दारांत बसून ढसढसा रडूं लागली. नामदेवाला कुणी कुठं जबरीन धरूनम्यावं मरणाच्या खाईत लोटावं ! नगीनाच्या उद्याच्या जीवनाचा त्राता कोण? नामदेवाचं तिकडं कसं होईल, या प्रश्नानं तर तिच काळीज विघधून गेलं. ज्यानं नामदेवाचं नांव सुचविलं होतं त्या पाटला- कडं ती गेली. तिनं त्याचे पाय घरले. अन्‌ अखेर नामदेवाला चावडीवरून सोडवून तिनं परत आणलं ! त्या रावी त्यांच्या घरांत उजळळेला दिवा अधिक तेजाळ दिसत होता. त्यांचे चहेरेहि तसेच सुप्रसन्न दिसत होते. पण यासाठी केवढी जबर किंमत पडली. अडीचदो तीनदो अधिकाऱ्याला शोसव्वाशे मघलोबाला द्यावे लागले होते. बावूलालची खातेवाकी कमी होत आली होती ती एकदम फुगली! तरी कजाच्या काळजीने ते व्यद्न झाले नाहीत. नामदेवाला नगीना मिळाली होती न्‌ नगीनाला नामदेव मिळाला होता. परस्परांनीं परस्परांना

२2 म्हगे लढाई सपली

नो ननड क्म ळा

घट्ट मिठी मारली अन्‌ आपल्या प्रीतीची प्रगा- ढता पटविली! >< > >< >< दिवस फारच कष्टाचे येऊं लागल.

महागाईंनं उच्चांक गाठला होता. अन्‌ लेव्हिनं व्यवस्थित पाय पसरले होते. ही लेव्ही म्हणजे लढाईतून निघालेलं आणखी एक शास्त्र होत. पिकाची आगेवाररी नोंदली जात होती. प्रत्येक एकरावर कांहीं एका प्रमाणांत धाम्य वसूल केल जात होत. ' खुष खरेदी ' म्हणून आणखी एक नियम केला होता वसुलीसाठी सरकारचे दूत जोरांत हिंडत होते, लॉज्या फिरत होत्या गोदाम बांधले गेले होते. पक नवच अन्‌ कित्येक माण- खांच्या स्वैर संचाराला वाव देणारं 'खार्त उघडल होतं ! धान्याच्या वागणीच्या वागणी कुठं भरून जात होत्या, कांही कळत नव्हतं !

वाभूळखेड्यानं लेव्हाचं पहिल॑ वपे कलं बसं काढलं. मग पावसाळा आला न्‌ कोरडाफर्‌ गेला. अधवट पिकं आली. अत्‌ आतां कस होणार या- चिंतेन बाभूळखेड्याला गांठळं त्रासलं !

तडा २९

कडाडला डाळवाडाडववाककवववडडडडायाडा लाकडाला वबडडा सडा हा आता हयाचा हता डा डा डया हह कुबड जब अेबब॒॒खााआिखशाााााशाशावाशबाबाब॒ाााधाबा्ब॒ग॒ब्ब ब्

नगीना दाहराला आली होती खेड्यातलं

जीवन गुंडाळून श॥ाहरांतल्या गोदामांत आणून जतन केलं होतं ! शहरांत गेल्यावर कुठल्याशा एका ठिकाणाहून चिठ्ठी मिळवायची न्‌ वाटपाच्या दुकानावरून ज्वारी घ्यावयाची असा करम होता. दुकानापुढ गर्दी बेसुमार दिसत होती.

“नगीना !

कुणी हांक मारली म्हणून तिनं वळून पाहिलं. तो रावजी होता. पूर्वीपेक्षा लट आणि तज्ञेलदार. ती ज्वारीसार्ठी थांबली आहे असं कळल्यावर त्यानं तिच्या हातातलं कूपन घेतल. थोडासा घांगडथिंगा करून त्यान गर्दी हटवली. गर्दी करणारांना शिव्या सुनावल्या चटकन्‌ ज्वारी घेऊन ता परत आला तो अशा थाटांत को, जणू आजकालच्या जगांत जॉवनाथ मिळवावा तो फौजी लोकांनीं !

गर्दीतून बाहेर पडल्यावर नगीना 'पैसे त्याच्या हाती देऊं लागली. तेव्हां तो म्हणाला,

राहु दे तुझ्याजवळ. इतका कां मी परका आहे?

२८ म्हणे लढाई संपली!

करटापाशपा

नना

मग कांही तरी बोलणं आवदयक होत असं वाटून तिन विचारलं, “घरधर्नीण कुठ आहे?” “सखलास !”

एकादी मोठी आनदाची गोष्ट सांगावी तशा आवाजांत हाताचा पजा आकाशांत उडवून तो बोलूं लागला.

वायकोच्या मृत्यूची बातो एवढ्या बाफिकीरीनं त्याने सांगावी हे नगीनाला आवडलं नाहीं.

रस्त्यांतला रिकामटेकर्डी माणस या दोघाकडं आश्चयानं पहात होती. या फौजी माणसानं एकादी परी गाठली होती को काय ?

तो तिची सोबत करण्याच्या तयारीन चालूं लागला. गांवाबाहेर पडल्यावर थोडासा एकाम्त आलेला पाहून रावजी म्हणाला,

माग झालं ते विसरून जा. आतां मी एक- टाच उरलो आहे. माझ्या पगारही वाढला आहे. एवढे 'वेसे आतां कुणासाठी मिळवायचे ?”

रावजी, लगीन कर दुसरं !

तडा १9

टपणपणणण४0॥५-५० पपटीशशफाला

*: असं तोडून बोलू नकोस नगांना ! तुझ्या- गळ्याची दाप्थ घऊन सांगता, माझं मन तुझ्या शिवाय कुठच लागत नाहीं !

असं बोलूं नकोस रावजी !” “नर्गाना ५!”

त्याच्या आवाजाला कांतरता आली. त्यान तिचा हात धरला तिला थांबवून म्हटलं,

माझं मन मोडू नकोस ! हे घे, हे पैसे ठेव तुझ्याजवळ ! मला तरी काय करायचत्‌!”

खेज्यांतून नोटांच एक पुडकं त्यान काढल न्‌ नगीनापुढ केलं.

“ह, रावजी !

ज्या आडदांडपणान रावजीच्या खालींत शिरून त्याला शासन केल होत, कांहीद्या तशाच आवे- श्यांत तिन हे वाक्य उच्चारलळ, अन्‌ रावजीवर अशी दृष्टी टाकली काँ पटकन्‌ त्यान तिचा हात सोडून दिला.

जणू स्त्री राजी आहे तोवरच लाघवासारख्या नाजूक उपायांनी वश होऊं शकते. नाराज स्थीला

२८ म्हणे लढाई सपली

जिंकायला संपत्तीची मध्यस्थीहि उपयागी पडत नाहीं!

रावजी निरादा होऊन परत जात होता! नगीनान पक मोठी लढाई जिंकली होती!

>< > >< ><

बाभूळखेड्यांत दुष्ट चिम्हांचा आता सुकाळ झाला हाता. कुत्री मरत होती ती आधी वस्तीच्या नांवानं मोठा गळा काढून! जनावरांना रोगटं होत होतं. चांगले दमदार कामकरी वेल आडवे पडत द्ोते. नामंदेवाचा एक बेल कामाला आला.

दुसरा चाऱ्याला तोड लाविनासा झाला. नामदेवांत रडण्याचंहि सामथ्य उरलं नव्हतं. सुगी आली होती. पण शेतांत फारसं धान्य निघालं नव्हतं. आणेवारी मांडणारानं नामंदेवा- कडून कांहीं मिळालं नाहा म्हणून पीक भरम- साठ दाखविल होतं. लेव्हीच्या वसूलीला कायदा आणि काठी घेऊन सरकार आल तेव्हां सारं घर धुवून सा€ झालं. एक दिवसाची चंदी देखील उरल नाही.

तडा २९

-->-२>---*५-ाापप-ा- -ना-------2- पा दाण. "यपाप्पाप 0४ पाटा पणा “नाप:

खुष खरेदी'च्या नांवान द्यायला कांहीं नाही, असं म्हणतांच मामलेदारानं चपराशाला हुकूम केला, नामदेवाला बेदम झोडण्यांत आलं! त्या लहानश्या क्षेत्रांत कांही दिवस तरी त्यानं नेकीन काढले होते. सुजनतेच्या जपणुकॉत इभ्रतीची एक कढपना उऱ्वली होती. सरकारी शिपुरड्यांनी तिचा कोट फोडला! शारीराच्या वेदनापेक्षां या अपमानाच्या वेद्नांनीच नामदेवार्‍चं मन खचल. शारमेन न्‌ अवमानान कांही दिवस त्यानं आंथरूणावर काढले. तशांत एक वेल कमी झाला दसरा जगतो की मरता याचा अंदाज लागेना! थोडस शेताकड जावं या विचारान तो उठला. गांवांत प्रसन्नता अशी दिसत नव्हती. धान्याच्या तुटींनं तेथल जीवन कसं भकास, उदास झाल होतं. शेताच्या उरळीवर बसून तो समोर पाहूं लागला. नांगरट वुजलेली कोरडी कार्ळाफर्‌ जमीन मनांत फारसा उल्हास निमोण करीना. ती तशीच खूप लांबवर पसरली होती. तिनच त्याला आजवर पाळल पोसलं होते अन्‌ आजचा कडवट दिवसही तिनच दाखविला होता. तिला आणखी एकदां

३० म्हणे लढाई संपली

अपीपणणापीपी00 नय

नांगराव, नीट करावं असा विचार येतांच वेलाची अडचण पुढं आली. तशांत बाबूलालचा कजञोचा आकडा एकदम मोठा फुगून दिसला ! छे जमीन त्याच्या हाती आतां राहील असं वाटत नव्हतं ! पुढचा काळ कसा काढायचा या विचारानं तर तो अगदी घायाळ झाला. एकदम मनःवक्षूपुढं रावजी आला ! खरंच नामंदेवानं लढाइत जायला पाहिजे होते ! जे भोग वाट्याला आले नू येताहेत ते तस आले नसते. त्यानं केवढी चूक केली होती.

केवळ नगीना मुळंच ता अडखळला होता न्‌ काय !

नगीना शहराहन परत थेत होती. सभोवार पसरलेल्या शोतालारखीच तिच्या चेहऱ्यावर अवकळा पसरली होती. एवढं घड्धाकट आणि सुंदर शारीर, पण काळजीन कसं शुष्क, निस्तेज दिसत होते. ज्वारीच दुकान एकाएकी बंद झालं होते ज्वारी मिळाली नव्हती इतका वेळ थांबून अखेर रिकामंच परत यावं लागलं होत ! नामद्‌व आजारी होता. तिची एकटीची मजुरी रोजच्या

तडा -4.4

खाण्यापिण्यासाठी पुरे पडत नव्हती ! विचारा- विचारांत तिला भास होत होता कीं काय कुणाला माहित ! कुणी तरी तिला हांक मारीत होतं, ' नगीना !

रावजीच तो !

तो चटकन्‌ कुठून तरा आला न्‌ ज्वारीच्या दुकानांतून तिला त्यानं ज्वारी आणून दिली ! मग खिशांतल नोटाचं एक पुडकं त्यानं काढलं. तं नगीना पुढं केलं न्‌ म्हटलं,

काय म्हटलं कुणाला माहित?

त्याच्या त्या शग्दांचा मात्र तिला आतां राग आला नव्हता !

माग दुसरा

जीवनाचे वारस

तिकडं लढाईला जोर चढत होता अन्‌ इकड या शहरांत कामधामाचे नुसत डोंगरच्या डोंगर उकरावे अन उरकावे लागत होते! शाहराच्या सुख्याधिकाऱ्याला, त्याच्या अमलाखालील अन्‌ संबंधा खात्यांतल्या माणसांना दिवस पुरे पडत नव्हता!

महिना संपत आला कों जावनोपयोर्गावस्तूचा कोटा, साठा, विभागणी, वाटणोा, देखरेख अशा कित्येक गाष्टीशां तांड यावं लागत होतं! कांहो एका ठराविक तारखेला द्र माणसागाणक ज्वारी गहू, तांदूळ, साखऱ्या, तेल आणि कापडाचे : परवाने ! द्यावे लागत होते. सरकारी निवडीचा ठसा असलेल्या दुकानदाराकडून मालाचा विको होत होती! शहराचो लोकसंख्या वाढलो होता

३६ म्हणे लढाई सपली !

->----८-पप----->>-५--- ->

नन

कलर सन्स ..._.._.----:--:- --:-न-::२२२<>-2०८-----------ापापापाापा

कीं काय नकळे! धान्य कापड दुकानावर यावयाला उज्लीर, दुसऱ्या दिवशीं बाजार सुना ! वाटप प्रमाणांत नाहीं अशी एक सनदशीर ओरड होती. वाटप मुळींच मिळालं नाहीं.” या ओरडीनं तर अधिकांऱ्याचे कान किटले होते. लोकांना ओरडायची सवयच लागली होती. युद्धभूमीपासून ते दूर होते म्हणून थोड तरी मिळत होत! नाहीं तर उपाशी मरावं लागलं असतं अशी सरकारी वतुलाची विचारांची तऱ्हा होती. लोकांचे पुढारी ह्मणविणारी कांहीं माणसं सभा भरवीत होतीं, अधिकाऱ्याकडं रिष्ट्रमंडळ नेत होता. परिस्थिती सुधारण्याचं अभिवचन मिळत होतं. अन मग पुन्हां ओरड सुरू होती! परिस्थिती सुधारण्याच सरकारी अभिवचन म्हणजे फास, असाच आजवरचा अनुभव होता.

धान्याची कापडाची तूट कशी नाहाशी करावी या विचारांत सरकारच्या प्रातिनिधांना झोप नसल्याचं ऐकू येत होत! धान्यावाचून मरू घातलेल्या लोकांना न्‌ त्यांना वाचावण्यासाठीं धड- प्रडत असलेत्या पुढाऱ्यांनाहि झोप नव्हती ! मम: बापू साताराम कत्रवारला तरी आराम कुठला?!

जीवनाचे वारस ३७ तिकडं लढाई णेन रंगांत येत होती अन हा हिकडं आत्मरंगात गुंग होऊन जात होता!

त्याच्या दुकानापुढून जी रहदारी सरकत होती तोत अधनश्न भुके कंगाल होते. अन्न धान्याचे पोशाखी गरजू होते. अन्न धान्याची व्यवस्था कर- णार होते. अन्‌ त्या व्यवस्थेवर जगणारे होते! त्या सर्वाकडं पाहून तो तुच्छतेनं हेसत होता. त्याच्या मनांत एकच विचार स्थिरावला होता. का, लोकांच्या गरजा बेसुमार वाढाव्या, जिकडं तिकड पदार्थाची दुर्मिळता भडकली जावी, बाजारभाव आणखी कडाडले जावे अन्‌ मग पहादी मजा!

सामान्य मनाला झेपणारा अस! दमदार विचार मनांत वागाविण्याची बापूच्या मनाची चांगळी तयारी झाली होती. पण या विचाराची पुसट लकेर देखील चेहऱ्यावर दिसूं देण्याचा अभ्यासाह त्याला होता. कारण एकाद म्राहक आलं कीं केवढ्या सोजन्यानं तो स्वागत करीत होता! तो विचारील ती नेमकी वस्तू मात्र त्याच्या दुकानांत नसायची हे अगदीं ठरून गेलं होतं.

३८ म्हणे लढाई सपली !

काय धोतर जोडा? अहो भल्याभल्यांना मिळेनासा झाला आहे !

अस उत्तर एकाद्या साध्यासुध्या म्राहकाला तो चटकन अशा पद्धतींत देत होता कां जण कापडाच्या साऱ्या गिरण्या शोधून पाहिल्या तरी, धोतरजोडा मिळणं राक्य नाहीं !

ग्राहक पॉारचयाचा अन चांगलाच नडलेला दिसला का तो म्हणत असे,

अही बाजारांत माल काय नाही म्हणता! दाम फेकलं कीं माल घर चालत येईल ! आज कालचे दिवस कसे आहेत तुम्ही जाणताच !

अन्‌ मग त्याला अगदीं रहस्यांत घेऊन म्हणे

केवळ तमच्यासाठी म्हणून मी घेइन शोध आणि देईन रवं त! मात्र किमतीचा कांही अंदाज सांगतां येणार नाहीं!

एकादा कायदे कानूनवाला आला तरी कत्रवार मुळींच भीत नव्हता. असलं ग्राहक संतापून -.तणतणत अधिकाऱ्याकड जात होतं अन थंड उत्तर ऐकून गार होऊन परत येत होतं !

जीवनाचे वारस २९

न---*----------५५ाा--->-2_- -:-ाापापनााशा"ााला--- >>>

नयम यळळळन लनन

माल गडप होणं, कांहीं एक ठराविक किंमत आली तरच तो प्रगट होणं अन अधिकाऱ्यांनी त्याकडं दुलंक्ष करणं या तिन्ही गोष्टींत एक विशिष्ट सूत्र असल्याची खात्री होत होती !

अशाच एका गरजवंताला कत्रुवारनं नुकतंच परत लावलं. तो ग्राहक आला होता तो, जणू त्याच्या प्रसत्न विचारांत अडथळा आणण्या- खसाठींच ! नुकतीच समारची चाळ त्यानं विकत घेतली होती. तिला लागून असलेली आणखी एक चाळ विकत ध्यावयाचे त्याचे बेत चालले होते. तो ग्राहक आला अन्‌ पांढर कापड माग्रूं लागला. तं अथात अंत्यविधीसाठी! ते चितेवर चढणाऱ्या प्रेता- साठीं असो किंवा बाहल्यावर चढणाऱ्या वरासाठाीं असो ! भाव येत नसल्यास यायचं कसं ? त्याला ती समारची चाळ ध्यायची होती. त्या चाळींत इतके भाडेकरू होते. दर महिन्याला अमूक इतकी रकम यावयाचा मार्ग निघणार होता. ती चाळ विकत घ्यावयाची की पडत्या भावांत भ्रतासाठीं कापड द्यायचं ?

दुकानापुढून कुणीसा एक अधिकारी जाऊं लागला. दोघांची नजरानजर झाली. अभिवादना-

४० म्हणे ठढाई संपली !

साठी आधी कुणी कुणाला हात उचलला हे मात्र समजलं नाही. दाघांचहि परस्परावर सारखंच क्रण होतं ! अधिकारी मनांत म्हणत होता, कत्र- वार माझ्या सुळं तुझी धडगत आहे ! कञ्नुवारनंहि त॑ ओळखलं हात प्रत्युत्तर केलं होतं, पुर, पुरे, माहित आहे आपली कुवत!

कन्रुवारला जे फार पूर्वीपासून ओळखतात त्यांच्या नजरपुर्ड फक्त एकच चित्र आहे ! आड- बोळातलं एक दीडखणी दुकान. तिथं हमाल मजुरांनाच तेळ मीठ मिळालं तर मिळायचं. बापू नांवाचं एक पोरगं दर आठवड्याला चुक- वती करून पंधरा वीस रुपयाचं नवीन सामान उचलायचं. छटाक अद्यावापेक्षां कांही वजने अस्‌ दहकतात याची त्याला कल्पनाहि नसावी ! आठवदहा रुपयांच्यावर कधी नाणं मोजण्याचाहि त्याच्यावर प्रसंग आला नसावा. कापड बाजार पहाणं म्हणजे एकाद्या काशी यात्रेसारखीच क्वचित येणारी संधी वाटली असावी. फाटक्या वार- दाण्यावर बसता बसता त्याचा त्याच्या बापाचा जन्म गेला! दिवाळीचं लक्ष्मीपूजन

जीवनाचे वारस 234

एकापणती वर अन्‌ एका सुपार्रीवर त्यानं आटोपलेलं असावं !

पण आज ?

या शहरांत आजकाल दिवस प्रथम कुणाच्या घरावर उगवत होता, सत्काराची स्वीकाराची सुखं वाट पहात बसतील असं कुणाचं घर होतं, समृद्धीचे वरदान देवार्दिकांना कुणाला दिलं होतं, सरकार दरबारांत मानमरातब ठेवून कोण होतं, अन्‌ वाजारांत विदोष बोलबाला कुणाचा

टोता ?

या सवे प्रश्नांची उत्तरं एकाच नांवांत सामा- वलीं होती.

बापू सीताराम कत्रुवार उफ बापू दोठ !

तरी वाठ्याचा कांही भाग अद्याप बांधून निघायचा होता. पेसे नव्हते म्हणता ? अहो योलता काय ?) एक भार बांधकामाचा माल- मसाला अन दोन भार सोनं अशा पद्धतीनं वांध- काम चालूं ठेवायची कत्ररवारची तयारी होती.

४२ म्हणे लढाई सपली !

---------“---५--------८५॥पा- एएी00एपाप ०?" नाणा पपप टप“

पण ह्या लढाईन लोखंड दुर्मळ करून टाकलं

होतं !

पाचसहा कुदुंव सहज समावू शकतील एवढा वाड्याचा विस्तार. वाड्यांत मोठमोठ्या लादण्या काढल्या होत्या. त्या नेहमीं कुलपं टाकलेल्या बंद ! रात्री अपरात्रांच त्या उघ- डल्या तर उघडत.

आंत काय असावं?

तं एक बापू कज्रवार जाणें किंवा लादण्या- सारखंच कञवारनं तांड बंद केलेले खाद्यपदा- थाच, कपड्यालत्त्याचे सरकारी नियंत्रक जाणोत!

आंत आजच्या राष्ट्राचं जीवन होत ! आजच्या ससत्कृत मनुष्य समाजाची इभ्रत होती! उद्याच्या जीवनाचं मम होतं ! मनष्य जातीचं रक्षण करतां येईल किवा तिच्या भक्षणाची तयारी ठेवतां येईल अशी महान शक्ति आंत होती !

काळ्या बाजारांतच प्रगट होऊं शकणारं जावनसवस्व धान्य आणि माणूस ज्यापुळं सुसंस्कृत सुंदर.दिस्‌ं दाकतो त॑ कापड !

जीवनाचे वारस ७३

जसख जसा बाजार काळा होणार होता तसं तसं कत्रवारचं नशोोब उजळ होणार होतं ! तिकडं लढाई सुरूं झाली अन्‌ हिकडं रुप्याचा भला मोठा लोढा वहात सुटला ! त्या घारत ज़ आले ते पिवळे होऊं लागले! कत्रुवार या लोंढ्यांत चांगला न्हाऊन निधाला होता, निघत होतान निघणार होता !

कत्नरवारच्या घरांत धन धान्य कसं उत्‌ आणि वाया चाललं होतं त॑ पहा ! खायची प्यायचा घरांत नुसती चंगळ उडत होती. भांडी उटा- यच्या चोकांतून जी नाली वहात हाती तींत भाताची शितं ऊंची खाद्य पेयांची उष्टी तंबून बसत होतीं. कत्रुवारची दोन तीन पोरं खात होतीं ओकत होती. अन मग त्यांना अन्न मानवत नाहीं असं वाट्रन देव दवस्की न॒ दुवा- खाने केले जात होता!

रस्त्यावरल्या माडीच्या दाराशी एका मऊ उबदार आंथरुणावर वसलेली, टोपपदराचं इर- कला लुगडं नेसळलली म्हातारी म्हणजे बापू- डाठची आई सोनूबाई ! सोनबाई आतां साक्षात्‌

सोनूवाई दिसत होती. सीताराम कत्रवारचा संसार काचा होता आतां कर कणवे असं वय नव्हत अन्‌ परिस्थिती तर नव्हतीच नव्हती ! अन्न बम्हाच्या साधनेत आराधनत हालचाल करतां करतां शीण येत होता आतां अन्न ब्रह्माचा वर लाभल्या मुळे ती इतका स्थूल होती की, बसली जागा तिळा उठवत नव्ह्ती. ते अवजड शरीर, टापफपदराचं लुगडं अन कातडींत रुतून चाललेले ते अलंकार असा तो अवतार दिसला कीं हसू यत होतं. एकाद्यानं सहज पाहिलं तरी म्हातारी संतापून म्हणत होती,

£ मेल्यांना माझं सुख देखवेनासं झाळं आह!

तिला भ्रम झाला होता यांत शका नव्हती ! तिला अलीकडं ऐएकूहि यत नव्हते. तिच्या जवळ कानांत कुजबुजायची अथवा हसायची कांही सोय नव्हती! तसा कांहीं प्रकार झाला कीं म्हातारी अंगावर खेकसलीच म्हणून समजावी!

माडावरच्या आणखी एका सजविलेल्या खोलात जीवनाचं एक वेगळंच चित्र दिसत होतं. बापूचे बळ सीताराम कतरुवार! गाद्यान्‌ गिर-

जीवनाचे वारस 8१२ द्यांच्या गराड्यांत निस्तब्ध, निश्चय आणि निदाबव्ट पडलेले ! खोली जितकी सजविळेली न्‌ सुशाभित तितकीच अवकळा आणि असुंदृरता सीतारामवर पसरलेली. दहारीर इतकं खिळ खिळं लुकड झाल होतं की गाद्या गिराद़ांच्या गराड्यांत एकादा माणसाचा फासोळा पडला आहे हे बारकाइन पाहिलं तरच कल्पना येत होती ! त्या वाळलेल्या हात पायांची हालचाल करायची जाली तर इतर माणसांची मदत घ्यावा लागत होती !

कसे सोन्याचे दिवस आले होते ! बापू तिकडं दुकानावर बसून राजरास डाके आणि डल्ले मारत होता ! भले बापू! शाबास बापू! असं म्हणून त्याला प्रोत्सारन ययायच सोडून सीताराम कतुवार राजयक्ष्म्याची रक्तक्षयाची निदान न्‌ अनुमानं एकत आणि अनुभवित पडला होता ! घरांत कापडाचा एवढा ढिगारा पडला होता. पण सीतारामच्या शारिराला वस्त्र पोळत आणि रूतत असावं ! 'घान्याच्या नुसत्या थप्याच्या थप्या लागल्या होत्या. पण घोटभर पाण्याशिवाय त्याच्या पोटांत विशेष कांहीं जाऊ शकेल असं दिसत नव्हत. मृत्यूचे कित्येक दिवसापासून

४९८ हणे लढाई संपली !

*-- ----- -न-----८--------4--ापापप-पा पाप“: 7€ शण"

चेध लागल होते. तो दुसऱ्या एकाद्या घरां असतां तर एव्हांना गंगारूप होऊन गेला असता. पण बापूच्या हातांत संपत्ती होती त्यामुळ जीव- नाच्या रक्षणाचे सवे उपाय, सव सायी उपलब्ध करतां येत होत्या ! सीताराम एवढ्यांत कचेल असं मुळींच वाटत नव्हतं!

वडिलाचं असं क्षीण चित्र बापूच्या डोळ्या- -पढ आलं. त्याला वाईट वाटले. गेजांत आणखी एक दुकान उघडायचं होतं. लढाईचा मोसम केव्हां फटकन सपन जाईल कांहीं कळत नव्हतं. छुसर्‍्या दुकानावर बसायला घरचा, विश्वासू असा माणूस सांतारामाखरीज कोण होता? त्यांच्या आजारानं प्राप्तीचा एक फार मोठा झराच अडूम बसला होता !

इतक्यांत दुकानापुढून एक खडवळ स्त्री सर- “कली. बापूने तिच्याकडं न्याहळून पाहिलं- बापच सन जाईल अशी ती नवहती. गोरी, पोर- सवदा, पण झुष्क आणि निस्तेज! नुसतं पहावं न॒ तुच्छतेनं तोंड वळवाव! त्यापेक्षां बापूची बायको कशी पुष्ट आणि सुदर! उंची वसनानं

जीवनाचे वारस ७७

नप टटलशाटणी 00"? 0ा? पा पी0धणणीली?0ी 0 पीय णी यी धटयाणणपण 0)? पी ाीन---.

नरप---->->-><

न्‌ अलंकाराच्या भाराने तर ती एकाद्या महा- छक्ष्मा सारखी दिसत होती दुकानावर बसून केलेले संकल्प सफल झालेले अनुभावित घरी जावे तिच्या गुवगुवीत शाराराची हालचाल पाहून डोळे निववीत शरीर सुखावींत झापी जाव !

या रस्त्यावरल्या खेडवळ चित्रांत बापूच्या वाढत्या उमेदीच शप्नन करण्याचं सामथ्यं तरी होतं काँ!

बापूला हे मात्र माहीत नव्हतं की त्या रस्त्या- वरील स्त्रीच्या पोटऱ्यांतून पुष्टी आणणारा, शुष्क स्तनांच्या हिर्या शिरांतून रक्त खेळविणारा, चेहऱ्यावर तजेला फुलविणारा, सारीच काया कमनीय आणि उपभोग्य करणारा धान्याचा कण महाग आणि दुर्मिळ झाला होता! बापू बापूचे लक्षावधी संबधी त्याला कारण होते. ह्या स्त्रीच्या सोंदयातला सारा उत्तमांश पिकून बापूनं आपल्या बायकोवर सारवला होता! कित्ये- कांची जीवनशाक्ति शोधून आपल्या घरांत साठ- विली होती!

आणि तरीहि त्याचे विचार चालूच होते.

४८ म्हणे लढाई सपली !

लोकांच्या गरजा बेसुमार वाढाव्या; जिकडं तिकड पदार्थाची दुर्मिळता भडकली जावी; बाजारभाव आणखी कडाडले जावे, अन्‌ छन छन असा एकच आवाज कानाशी सारखा घोटाळत रहावा!

भाग तिसरा

लढाई संपली ?

: हुकुमराहाचा अंत !

अशा अथाच्या बातमी खालों लोकांनी त्या प्रेताची विटंबना केल्याचा जो मजकूर होता, तो वाचून मला वाटलं, काय हा लोकदेवतेचा लोक- विलक्षण प्रणयप्रपंच !

रामराज्य यावं म्हणून लोकांनां तपश्चर्या केली- अखर हवं रामराज्य आलं ! आणि सोते- सारख्या साध्वीवर विकल्पांचा वषाव करून ज्यानं ते राज्य आणलं त्या रामाला लोकांना मात्र दुःखी केलं !

आपल्या प्रतिभेनं विचारांना नवनवा क्षितिज ज्यानं निर्माण केली, त्या सक्रेटिसाला विषाचा प्याला पाजविला तो ह्याच लोकदेवतनं ! त्याच्या

ष्ट्र म्हणे लढाई संपली !

न--->-_>_८“ा“ना->ाााा बाप“: 2-८: प---ा---- ---ऱ------

सरृत्यूनंतर कुठं त्यानं घडलेल्या संस्कृतीच्या' अलंकारांचं महत्व कळन ती त्याच्या नांवानं ते उरावर वाहू लागली अन्‌ त्यांचं रक्षण करूं लागली.

अधम प्रवृत्तांचं पश्युतेचं राज्य होतं. सदा- चाराचीं वस्त्रं आभ्रषणं मळीन होऊन गेली होती. नश्न, निभूंषण आणि निःसंग लोक देवतेची अवकळा पाहून कुणी एक महात्मा अवतरला अन्‌ त्यानं तिजवर दयेची शाळ घातली. उन्मत्त आणि अविचारी लोकदेवतेनं “यानं माझ्याझीं प्रसंग केला !' अशी ओरड करून त्याला फासा- चर चढविले. प्रभूच्या अवसानानंतर मात्र तिचे डोळे उघडले. त्याच्या थडग्यावर ती ऊर बडवूं लागली. करूसच्या रूपानं त्याच्या प्रीतीचं चिन्ह अद्यापहि ती बागवीत आहेच ना !

इटलीच्या लोकांनीं मुखलोलिनीला नेता म्हणून निवडलं ! त्याची पूजा केली. त्याच्या गुणांचे पवाडे गायिले. आणि अखेर कत्यासारखा त्याचा खून करून पदप्नररां्नांच त्याचा सत्कार केला !

उत्कट प्रेमानं मिठी मारण्यासाठीं प्रियकराच्या गळ्यांत हात घालायचे न्‌ लगेच गळा दावून

लढाई सपली ! पठे

बपपद->>--र

त्याचा प्राण घ्यायचा! स्तनांनीं चरण चुरण्याचा दखावा करायचा न्‌ क्षणांत त्याच्यासाठी विषार काढायचं!

आणखी कोणत्या वैचारिक आदशाचा पाठ- लाग करूनहि लोकदेवता त्याचा घात कर-

या मृत्युनं लढाई संपत आल्याची घंटा मात्र बडविली! आणि खरंच एकदाची लढाई संपली!

लढाई सपली तरी अद्याप आम्ही रांगेत उभे आहां!

शिकविलेळं सहसा वाया जात नाहीं म्हण- तात ! रांगेत उभं रहायचं शिक्षण फार पूर्वीच आम्हाला दिलं गेलं आहे ! आधुनेक रिोक्ष- णाच्या सखोलतेचा न॒ दूरगामीत्वाचा केवढा हा झणझणीत प्रत्यय ! पण रांगेतल्या रेटारेटींत टिकून राहणारी ताठरता मात्र आमच्यांत उरली नाहीं. एकाद्या आघाडीवर पाठविण्यासाठी तयार केलेली ही रांग नाहीं किंवा एकादा भयंकर गुन्हा केल्यामुळं क्रमाक्रमानं एकेकाला गोळी

५8 म्हणे टढाई सपली ! घालणं सुलभ जावं म्हणूनही ही रांग करण्याचा उद्देदा नाहीं !

गुन्हा म्हटला तर आहे ! जिवंत रहाण्याचा एकच भयंकर गुन्हा आम्हीं केला आहे !

रांगेतल्या एकेकाच्या चेहऱ्यावरलळे भावाहि पहाण्यासारखे आहेत ! जणू आकाशाचा पडदा फाटणार आहे ! इंद्रपुरींची दारं सताड उघडली जाणार आहेत ! आणि रांगेतल्या माणसांना तेथली लूट मिळणार आहे!

फक्त दार उघडायचं मात्र स्वाधीन नाहीं!

इथं उभं राहून पाहिलं तर खुल्या अथवा मेघ व्याप्त आकाशाचा आलोक स्पष्ट दिसेल. त्याला पाहून एकेक उप्तेक्षा मनांत चमकून जाऊं शक- तील. हे आकारा!

वर्षांकालच्या पानोत्सवाच्या निमित्तानं रुप- रसानं भारावलेल्या न्‌ उन्मादानं बेताल झालेल्या मेघकामिनीचा मेळा जमला आहें. उत्य चाललं आहे. त्या भावपूण हालचालींत वस्त्राची शुद्ध नाहीं. एकाच उत्तान अनावर भावनेनं चळचळ-

' लढाई सपली प्पप्र णाऱ्या त्याच्या उरांतलळी अभिलाषा विजेच्या मिषानं कडकडून आली कीं भल्याभल्यांचा ताल राहील असं वाटत नाही !

अशा गढूळ वातावरणांताहि तूं मात्र विन्मुख आहेस, उन्नत आहेस. आणि संयत अहिस ! आपल्या प्रीतीचा एकमेव निळा आभास जाग- बीत बसला आहेस ! धन्य तुझं प्रेम कीं ज्याच्या चितनांतून चंद्रिका पसरते नाही तर तेजोनिधी साक्षात्‌ होतो. काळी भोर रात्र पसरली कीं वाटू लागतं आम्हा मानवांची दषत दृष्टी टाळण्या- साठीं, तुझी प्रियसी आपल्या मऊशत कचभारा- खालीं तुझे तांड झाकून मनसोक्त चोबित आहे !

पण पुन्हां बघावं तर तूं उदास आणि निळा!

तूं एकादा पार्वतीखी नाहीं तर एकाद्या जान- कीची फसगत तर केली नाहींस?

मग हा चिरविरहाचा तुला शाप कां म्हणून !

आभाळ नसलं तर त्या निळ्या आदायाखालीं शांति त्रम्हाचा निवास (7016९ 01 511९100)

५५६ म्हणे लढाई संपली !

-. दमननाऱप--५---५-८-८-८२-४५---०-०----->>--2--:------------ापाा८--< ळा

कुठ असावा याचा शोध घेत घेत निरवधान हातां येईल !

दूरची क्षितिज नजरेच्या कक्षेत येतील असा उंचवटा इथं नसला तरी रसचं घर, त्या घराची रचना आणि घरांतल्या हालचालींचा येथून वधहि घेतां येतो!

तिची ती विलक्षण मोहक गोरमोहिनी ! वस्त्र प्रावरणांनी सजविळी तरी आकषक! वसनाचे अंतराय झुगारून अन्‌ दीप विझवून पाहिली तर पतंग झेप घेतील अन्‌ ही शीतल दाप्ति म्हणून निराश होऊन परततील, अशी मनोरम!

एकाद्या कार्दैबरीतलं नखरेळ लाजाळुं असं आमचं प्रम नाहीं! तं जितकं धीट तितकंच संयत! उत्तान तितकंच गाढ! वयानं ती विक- सित आणि परिपूर्ण! कांहीं शिकवायची सांगा- यची आवश्यकता नाहीं, जवळ ये म्हणून संकेत करायचं कारण नाहीं. एकाद्या नवाढेच्या अभेद्य लज्जेशी करावा लागतो तसा झगडा करण्याचं कारण नाहीं. ओठ जुळविले कीं तं चुंबना- साठींच अस जाणून प्रत्युत्तर करायची तयारी !

लढाई संपली ५9

ग्नाापापापप्ट- -- --“ “>

दप

बाहू पसरले कीं आलिंगनाच्या ओढीनंच हे ओळखून त्यांत दिरायची तप्तरता.

हं सारं ठीक होतं. पण आकाझावर एंकेक उत्तेक्षा रचायच्या, शांति ब्रम्हाचा शोध घेत बसायचं, ' रसा दार उघड ! ' असं आतं होऊन म्हणायचं कीं रांगेतळी आपली जागा सांभाळा- यची असा प्रश्न होता. कला, काव्य, भ्रेम यांचा आस्वाद घणाऱ्या, उपासनाची जोपासना कर- णाऱ्या वृत्ति नुसत्या कुसकरून गेल्या आहेत.

ही रांग अशा ठिकाणीं आहे की जिथं आजच्या संस्कृतीच्या विकासाच्या न॒संवर्थ- नाच्या साऱ्या नाड्या गुंतून पडल्या आहेत !

मोढा आहे हा!

अन धान्याच्या दुकानापुढं वाटपाची वाट पहाणारी रांग आहे ही!

रांगेंत विविध वृत्तीच प्रददान ही दिसतं!

एक दिवाळखोर देदमखी थाट रस्त्यावरच्या एका महारणीकडं पहातो आहे! चांगले पहाण्या-

५८ म्हणे लढाई संपली !

7-2

ननक

सारखे चेहराहे आतांशा इष्टीस पडत नाहींत. तरी ती देशमखी शेजाऱ्याला कोापऱ्याखळीनं धक्का देत म्हणते आहे,

&£चालतां बोलतांना लागला धक्का त्याचा राग”

€-.___ 6”

शुष्क वृत्तींना धार आणण्याचा हा एक निर्जव प्रयत्न आहे!

आमच्या वर्गातळे एक बळवंतराव जवळच्या नानासाटेबाला म्हणताहेत,

आं नानासाहेब! केव्हां आलात? कांहीं नवीन बातमी! महागाई भत्ता बाढणार अस- ल्याचं गॅझेटांत आलं होतं तें खरं कां? नाहीं वरच्या ऑफिसांत जाऊन आलात म्हणून विचारल!

एवढ्या उलथापालथी झाल्या आणि होऊं *घाबल्या तरी महागाई भत्त्याचाच विचार कर- णारी वृत्ती कोणत्या दजाची? दर्जा कोणता कां असेना पण ती सरळ आहे. अन्‌ अडचणीवाचून जगतां यावं हीच इच्छा आहे!

लढाई सपली ! "५९

टर्शिशिणणे शि किश्शिणिणा पण 100 कयणीकळळाकीट टाक

एक वृद्धापकाळ जांभाई देऊन म्हणतो आहे,

“£ अरे राम दुकान उघडतय कीं नाहीं आज? यांपेक्षा तकदीराचा दरवाजा खटखटला असता तर कांहीं चांगली बात घडून तरी आली असती !”

एक उत्तर आल,

बेशक! पण नशिबाचा दरवाजा दगडाचा असतो. कपाळमोक्षादवाय तो उघडत नाहीं!”

हास्यानच या भाष्याचं स्वागत झाल! आणखी एक आवाज म्हाताऱ्याला म्हणाला,

ज्याच्या गोवऱ्या स्मशानांत गेल्या आहेत, त्यांनीं धान्याच्या दुकानापुढली जागा अडवि- ण्यांत अथे नाहीं!

म्हातारा म्हणू लागला,

अरे भाई! तू. अजून बच्चा आहेस! फक गोष्ट सांगतो ऐक. असाच तुझ्या वयाचा एक राजा होता. राजवाड्याच्या गच्चीवर बसल्यावर त्याला बागेंत अजब दृष्य दिसलं. बागेचा

६० म्हणे लढाई सपली !

भणाणाणण पापी

भटा“:

म्हातारा माळी वेलीच्या ताटव्याखाळी आपल्या जख्खड बायकोशी इष्क करीत आहे! पातदाहा संतापला. त्यानं म्हाताऱ्याला धरून आणलं फांसावर चढवायचा हुकूम दिला! म्हातारी मोठी समजदार होती. मठींत कांहीं तरी झाकून ती राजापुढं आली. मूठ उघडून ती राजाला म्हणाली, जावर जगांत हं आहे तांवर वासना कांदी मर- णार नाही! मुठींत काय होत? तांदूळ !

अशा विविध वयोमान आणि प्रवृत्तीवरोबर भारतांतल्या सवंत्र जाती उपजातीतलीं माणसं या रांगेत आहेत! अन्नाच्या निमित्ताने सववत्र एका रांगेत, एका दजात आलेल्या या जाती म्हणजे केवढं संतोषदायी इश्य!

पण कालमान ओळखणारी न्‌ कालमानाचा फायदा घेणारी माणसं ह्यांत आहेत! ती पहा पांचव्या कां सहाव्या नंबराला ढकलून कुणी एक आसामी जबर्रीनं घुसली.

रांगेची व्यवस्था करणाऱ्या सत्तेच्या प्राते- निधीर्‍्या नजरेस ही गोष्ट आणली गेली.

लढाई सपली ! द्र

अ्र्न---८५-२२--०----:->->----<->--॥--८ट-> एपलफएईलशकणण | ऑर्शिशिशणणा* “पणा या

सरकारी दूताकडून उत्तर आलं आहे,

£ माग उभं राहिलं तर बिघडल काय? पुढं उभं राहून धान्य अधिक मिळतं असं थोर्डंच आहे

या तत्वक्ञानानं अवमानित माणसाचं समा- धान होणं ठाक्य नादी. तो चरफडत मुकाट्यानं मागं सरकला होता!

जबरीनं आंत घुसलेला माणूस, न्‌ त्याला सहाय्य करणारा सरकारी प्रतिनिधी, कोण होते!

सुसलमान !

बेधुभावाची शिकवण देणारे मोठ्या तळम- वळीनं लिहिलेले लेख अथवा व्याख्यान अशा वेळां मनाला सावरून धरू ठाकत नाहांत!

जीवनाच्या प्रत्येक क्षणांत ण्का विष्ट जातीलाच महत्व दिल जावं, तस देण्याचच एकाद्या सत्तेची सारी शाक्त केंद्रित झालली दिसावी?

मनुष्यांत मनुष्याला दाखवावयाच्या ओदार्यांचा हा धडधडीत खून तो! यांतच आजचं राज-

९२ ग्हणे लढाई सपलो !

*--बटपानिशशणण

कारण आंदोलत होत ! बहुसख्यांना सहानुभाव व्यापक ठेवावा या म्हणण्याला विरोध नव्हता. पण खहसा दुलंभ आणि अमोल सहानुभाव स्वीकारण्याची जिंकण्याची पात्रता अल्पसंख्या- कामी मिळवण तर अवश्यक होतेना!

शेत मोठ्या मेहनतीनं नागरलं जाते ! पीक चांगलं यावं हा हेतू ! पेरणी होते ज्वारीची हिरवी गार धाटं पाहून शेतकऱ्याला वाट्टं लागत, आपल्या श्रमाचं आतां चीज होणार ! त्या सत्ंघ ज्वारीत एकादंच कणीस असे निघतं की, शेत- करी ज्यासाठी कष्ट करतो ती मोत्यांची देणगी त्याला नसते ! भूमि एक ! निर्मितीसाठी खपणारे हाताहि एकारचेच ! निमितीच्या मुळाशी एकच भावना ! आकार विकार सारे कणसाचेच ! पण अंतरग असं कीं दोतकऱ्याच्या श्रमाचं त्यांत चीज नाहीं ! त्याच्या जीवनाचं सत्व नाही !

अश्शा कणसाला शेतकरी मुसलमान म्हणतात !

या रांगेत अश्शी ही माणसं आहित कीं ज्यांच्या घरांत धान्याचा, तेलाचा, अन इतर जीवनोपयोगी वस्तूंचा भरपूर सांठा असेळ ! तो रकय तो

लढाई सपली ! द्र

काप -नन---->> ह“ --->>>><><_-->->>:--“ााा-------ाा--पााट-<

वाढवावा म्हणून ते इर्थ धक्के सहन करात उभे आहेत ! उद्या धान्य दुर्मिळ झालं तर काय करा या भयांतून ही चिकाटी निघाली ! भाविष्य अनि- श्वित झाल्याचा हा पुरावा आहे ! उद्यावरचा माणसाचा विश्वास उडाला तर जीवनांतील महत्तम आणि पवतर गोष्टींची जपणूक होऊं नये यांत आश्थयं नव्हतं !

लढाईनं हा क्रम सुरूं केला ! अन लढाई सपल्यावर तरी असं कोणतं प्रसन्न हश्य दिसतं आहे ! अनीर्तांचे, अज्शांतीचे नुसते खच पडले आहेत ! कांहीं घडण्याऐेवजी जिकडे तिकडं नुसता बिघाड दिसतो आहे ! एकाचा अहंकार भडकला वाटलं प्रलयानं आपले पाय रुतविळे आतां ! त्याच्या प्रतिकारासाठी कित्येक शाक्ति उठल्या ! हातांत शास्त्र नसलेला, गुलामाच्या कवचांत गदमदून जात असलेला, मोठमोठ्या वेचारक आदर्शाची उपासना करणारा मनुष्य जातीचं हित व्हावं अशी सदिच्छा वागविणारा माणूस त्या तशा हादरलेल्या डळमळत्या भूमीवर भविष्याकडं दृष्टी लावून बसला तो अहंकारी जगाचा नायनाट होऊन नवं मन:-

<४ म्हणे लढाई सपली !

कल्पित आणि मनःपाजित जग अवतरणार अशा विश्वासानं !

पण युद्धोत्तर जग म्हणजे जुन्याच जगाची नवी आवृत्ति दिसते आहे!

परवाच आमची चाळ बापू कन्रवारच्या मालकीची झाली. त्याचा नोकर चाळीतल्या भाडेकरुंला सांग्रू लागला.

“£ ही सर्बंध चाळ आतां बापूदोठ कत्रवारच्या मालकीची झाली आहे मालकानं दीडपट भाडं वाढवायला सांगितळं आहे. ज्यांना परवडत असेल त्यांनी रहावं, नसतां आठ दिवसांत जागा

रिकामी करावी!

जुन्याकाळी एक राजा पराजित होऊन दुसरा गादीवर आला कीं चहुकड द्वाही फिरविण्यांत येत असे, ' नवे राजसाहेब गादीवर आले आहेत, प्रत्यकान अघक इतका कर भरावा, असा हुकुम आहे. ज्यांना मान्य असल त्यांनी तो तत्काळ दाखल करावा. नाहीं म्हणणाराचं घरदार जप्त होईल न्‌ त्यांना राज्याबाहेर काढून देण्यांत येईल!

लाई सपली ! "५

---“---ऱपपापाप---->५८--८प-२:>> ५>><<<>>-_ाञाा-“ा“आ“““ाणाानमा 0 नन 0 00 0 0 0 १0१)?” शी > अव

त्या राजाज्लृंत आणि या हुकुमांत विशेष कांहींच फरक नव्हता!

एक चाळ दुसऱ्याच्या मालकीची झाली होती. एका ठिकाणचा पेसा दुसऱ्या ठिकाणीं आला होता.

महायुद्धान जो कांही बदळ झाला असेल तो एवढाच!

मानवतेच्या संरक्षणाची ज्यांनी दापथ घेतली तेच संहाराचे विश्वव्यापी कट रचाताहेत ! विना- शाच्या पद्धतशीर योजना आवरताहेत ! रक्ताचं संरक्षण रक्त पिऊन करायचं ' रक्ताशदिवाय कित्येकांच्या शास्त्रास्त्रांना धार येईनाशी झाली आहे ! बंधुभावाच्या उमाळ्याचं प्रददानाहि रक्ता- वाचून होईनासं झालं आहे ' एवढीं माणसं मारली, गांव बेचिराख केलीं, तरी जुने डाग निघण्याऐवजीं नवे कलंक चिरस्थाई झाल्याचं दिसतं आहे ! ध्येयांचां पटकुरं करायची, आद- शाचि पायपोस करायचे एवढच आजच्या बलानं साधलं आहे न्‌ त्याला नेतिकता आणण्यासाठी सांधिक कार्यक्रम चालूं आहेत !

अशा जगांत उदात्त अविनाशी भावना वाडम- यांतून जो पासच्या कीं त्यावर पुटं चढलेलीं बघायचीं ! वीरवृत्तीची स्तोत्र गायची कीं पशु-

म्हणे लढाई सपली

तेचं प्रदरांन पहायचं ? माणसाला माणूस म्हणून जग यया असं उच्च स्वरानं सांगायचं कीं माणूस- कीच खून पडलेले पहायच !

नवं जग रंगविण्यासाठी रंग निवडले, जा घडण काल्पली, भाव भावस्थीर कले त्यांचा विचका झाल्याचे माणूत पाहू दाकता ! सहन करू दाकता ?

नाहीं कसं म्हणाव !

ते तसं पहात आणि सहन करीत मी, आम्हीं, तुम्ही या रांगेत उभ आहोंच ना!

अर्था पाऊण तास तिउत ठेवल्यावर कुणी एक! महाभागानं येऊन सांगितल;

दुकान उघडत नाहीं ! अपेक्षित साठा अद्याप आला नाहो ! तो केव्हां यईल याचा नेम खसांगवत नाही! ”... ...

युद्ध सुरू झाल्यापासून हाच अनुभव आला युद्धानेतरहि तो तसाच येतो आहि. पण या आपत्तिवद्दल भातां वाईट वाढून घेण्यांत कांहींच अर्थ नव्हता. पिचलेल्या न॒ खचलेल्यासाठी अनुकूल परिस्थिती टप्याटप्यानं पुढं यते आह, असहि आउत्ति सांगते आहे ! लढाईने आणखी एक गोष्ट सिद्ध केली आहे, चिरडलेले उत्थापित होऊं दाकतात जगाला हालवू शकतात !

नागपूर प्रकाशन, सिताबर्डी, नागपूर.

प्रकाश

माझें कादंबरी लेखन वीणा लढवय्ये

शाककर्ता शालिवाहन .

परामर्श

प्रमद्रा

अमावास्या .. द्राविडी प्राणायाम प्रत्यय

कंगाल

दोन घडी'्चा डाव माझी शीला... पुन्हां एकदां अडेल तट्टू .. मृगाचा पाऊस लांब लांब सावल्या सन १८५७ चे यद्ध तेरी चूप मेरी चूप

दोन प्रख्यात युद्धतंत्रें .

म्हणे लाई संपठी

भी

(_&4

(१) सखी-कादूबर वि. वि. बोकील (२) नवी मल्यं-लेखसंग्रह पु. य. देदायाडे ( ) सावलीच्या उन्हांत-काद्‌बरी प्रा-श्रीराम अत्तरदे (४ ) जीवनप्रवाह-कादूंवरी द. गं. प्रधान (५) चोथें पानिपत-कादुंबरी बी. रघुनाथ (६) जपानचे अभिनव युद्धतंत्र (७ ) महायुद्धाचा वणवा (सहाभागांत प्रसिद्ध होणार)

हयिहिर वाभन देरापाडे

प्रती थोड्या छापणार आहात ग्राहकांनी आपली ओडर आगाऊ नोंदवावी

नागपर प्रकाशन, सिताबडी, नागपूर,